Thursday, January 9, 2025
Homeराज्यनागपुर | प्रवीण बागड़े यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जाहीर...

नागपुर | प्रवीण बागड़े यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जाहीर…

नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तर्फे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग 1 व 2 अधिकाऱ्यांमधुन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या संचालक, विस्तार शिक्षण विभागातील कार्यरत वरिष्ठश्रेणी लघुलेखक/स्विय सहायक श्री प्रविण मोरेश्वर बागडे यांना 2023-24 या वर्षाकरीता ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. 25 व्या विद्यापीठ वर्धापन दिनी विद्यापीठ मुख्यालयी आयोजित सोहळयात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार विद्यापीठ मुख्यालय अधिनस्त घटक महाविद्यालये/प्रक्षेत्रे/संस्थेमधील 2023-24 या वर्षाकरीता वर्ग 1 व 2 संवर्गातून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एक शिक्षकेत्तर अधिकारी, तसेच वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांकरीता प्रत्येकी एक पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात येणार आहे.

सदर पुरस्काराचे उद्दिष्ट म्हणजे विद्यापीठ तसेच विद्यापीठ अधिनस्त घटक महाविद्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेणे, कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सेवा तत्परता व विद्यापीठाप्रती आत्मीयता वाढविणे, कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि असाधारण योगदान देण्याची भावना जोपासने व त्यांची कार्यक्षमता वाढविणे असे आहे.

श्री. बागड़े यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्‍यातील दूधबर्डी येथे 20 हेक्टर शासकिय जमीन संपादित करून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी शासन निर्णय काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याआधी त्यांना २०१७-१८ करिता “उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला होता.

ते महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणुन कार्यरत होते. शासन आणि प्रशासनाच्या अनुभवासोबतच त्यांना समाजसेवा आणि साहित्याचीही आवड आहे. त्यांनी कोविड अंतर्गत अनेक रुग्णांची सेवा सुध्दा केली असुन त्यांचे महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर 250 वर लेख तसेच 100 वर मुलाखती/स्तंभ सुध्दा प्रकाशित झाले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: