Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमिरजेतील प्रथमेश ढेरे टोळी, दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार...

मिरजेतील प्रथमेश ढेरे टोळी, दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार…

सांगली – ज्योती मोरे

मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार प्रथमेश ढेरे टोळीस पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. सदर टोळीतील प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे. वय 21,राहणार- मंगळवार पेठ, मिरज. विशाल बाजीराव शिरोळे.वय -20.राहणार – मंगळवार पेठ,मिरज.आणि सुरज चंदू कोरे.वय- 22 राहणार-ढेरे गल्ली, पाटील हौदाजवळ,मिरज.आदींनी.

2020 ते 2022 दरम्यान खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे ,घातक हत्यारा नशी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आदेश डावलने, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, गर्दी मारामारी करणे, तडीपारचा आदेश असतानाही पूर्व परवानगी न घेता हद्दीत प्रवेश करणे,असे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्र अधिनियम सन १९५१ च्या कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर तेली यांनी पारित केला आहे. सदर कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,पोलीस निरीक्षक संजीव झाडे शहर पोलीस ठाणे मिरज, सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ऋषी बडणीकर यांनी सहभाग घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: