नरखेड – अतुल दंढारे
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेल्या नरखेड येथिल प्रतीक नंदकुमार कोरडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात ६३८ वे स्थान प्राप्त केले. ग्रामीण भागातील युवक स्पर्धे मध्ये कमी नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वडील नंदकुमार कोरडे सैन्यात व आई वंदना या गृहिणी आहेत. वडील सैन्यात असल्याने प्राथमिक शिक्षण तालुक्यातील भिष्णूर येथील मामा तारखेश्वर घाटोळे यांच्या कडे आजोळी राहून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत घेतले. पाचवी ते दहावी शिक्षण नगर परिषद हायस्कुल नरखेड येथून झाले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करण्याचे ध्येय सुरवातीपासूनच ठेवले होते. त्यामुळे बी एस सी झाल्यानंतर एम ए इंग्लिश मध्ये केलं. मागच्या वर्षी प्रकृती अस्वास्था मुळे यश प्राप्त होऊ शकले नाही . परंतु न डगमगता जिद्दीने यावर्षी परीक्षेला सामोरं गेला व यश प्राप्त झाले.
प्रतीक ची मोठी बहीण पूनम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास पोलीस दलात दाखल झाली आहे . काटोल पोलीस स्टेशन ला ती उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दुसरी बहीण पूजा ही औषध शास्त्रात कार्यरत आहे.
वडील नंदकुमार कोरडे हे सेवानिवृत्त माजी सैनिक आहे तर आई वंदना या गृहिणी आहे. त्याच्या यशामुळे नरखेड चे नाव उंचावले असून सर्व क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.