मुंबई – गणेश तळेकर
प्रेम… आयुष्यातला हळूवार क्षण… त्याला आणि तिला जोडणारा रेशमी बंध… हा बंध त्यांच्याही नकळत कधी जुळून येतो हे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेतला प्रेम हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक वेगळी गोष्ट आहे. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर?
हे नाही ठरवता येत. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ हा संगीतमय प्रेमपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित या संगीतप्रधान चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.
नाट्यस्पर्धेत लहानपणापासून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता प्रतिक गौतम याने आजवर एकांकिका, शॉर्टफिल्म यांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या काहुर या लघुपटाला दिल्ली फिल्म फेस्टिवल- २०१६ व जयपूर फिल्म फेस्टिवल- २०१६ मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ग्रामीण भागातल्या प्रतिकने मेहनतीने आपल्या इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले.
ग्रामीण भागातून येऊन स्ट्रगल करून, चित्रपट क्षेत्राशी काही संबंध नसलेला सामान्य कुटुंबातील पूर्णपणे ‘नॉन फिल्मी बॅकग्राऊंड’ असलेला प्रतिक एक बिगबजेट मुव्ही करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन इथे उभा राहतो ही विशेष गोष्ट आहे. श्रद्धा भगत ‘फतवा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी श्रद्धाची ख़ास अभिनयाची कार्यशाळा घेण्यात आली. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवायला सज्ज झाली आहे.
‘फतवा’ चित्रपटाचे संगीत विविध शैलींचा अनोखा अनुभव देणारे आहे. वेगवेगळ्या जॉनरच्या सहा सुमधुर गाण्यांचा नजराणा यात असून विशेष म्हणजे अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेले ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे ख़ास आकर्षण आहे.
रवि आणि निया यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘फतवा’ चित्रपटात बघायला मिळणार आहे. या नव्या जोडीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत.
फतवा कास्ट और क्रू
प्रस्तुती – ब्ल्यु लाईन फिल्मस्
निर्माते – डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार
कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार
दिग्दर्शक – प्रतिक गौतम
कथा- प्रतिक गौतम
छायांकन – दिलशाद व्ही. ए.
संकलन – फैजल महाडिक, इमरान महाडिक
कला – योगेश इंगळे
साहसदृश्य – कौशल मोजेस
रंगभूषा – प्रताप बोऱ्हाडे
वेशभूषा – वर्षा
गीतकार- बाबा चव्हाण, डॉ.विनायक पवार, अमोल देशमुख, आराफत मेहमूद
गायक- सोनू निगम, नंदेश उमप, पल्लक मुच्चल, अभय जोधपूरकर, वेदा नेरुरकर, साबरी ब्रदर्स
संगीत- बाबा चव्हाण, संजीव–दर्शन, प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार, आराफत मेहमूद
कलाकार
प्रतिक गौतम – रवी
श्रद्धा भगत -निया
छाया कदम – आईसाहेब
मिलिंद शिंदे – सदू
नागेश भोसले – अण्णासाहेब
पूनम कांबळे – माला
अमोल चौधरी – दादासाहेब
संजय खापरे
निलेश वैरागर
निखिल निकाळजे
निकिता संजय