शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या विमा कंपनीवर कारवाई करा व शेतकऱ्यांना १०० % विमा रक्कम वितरीत करा अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केली आहे. पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तुटपुंजी मिळत असल्याने शेतकरी आक्रमक…
स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी आज ८ डिसेंबर रोजी जळगाव जा. तालुका कृषी कार्यालयावर धडक दिली आहे. यावर्षी अतीवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोडकी भरपाई देउन कंपनीने चेष्टा चालु केली आहे. याचाच आक्रोश करीत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना १००% पिक विमा मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे…