Sunday, December 22, 2024
Homeराज्यशितलवाडीतील शिव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न...

शितलवाडीतील शिव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- शहरालगत असलेल्या शितलवाडी मधील भाग्यश्री कॉलनी मध्ये असलेल्या शिव मंदीराचा नुकताच दि. १ मे रोज बुधवार ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते.

येथे हे शिव मंदीर जुनेच होते मात्र त्या मंदिराला टाईल्स लावुन तथा इतर डागडुजी करून त्याचे नुतनीकरण करण्यात आले. तसेच येथे अन्नपुर्णा मातेची नवीन मुर्ती सुद्धा स्थापीत करण्यात आली.

१ मे रोज बुधवारला येथे भजन पुजन तथा महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. दरम्यान पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी येथे येवुन दर्शन घेतले. यावेळी राजू कापसे, माजी सरपंच मदन सावरकर, किशोर फलके, सचिन भोयर, बंडू सलामे, विनोद चौरे, कमलेश सहारे, सदानंद साठवणे प्रभाकर सलामे, कमलेश सहारे, कोठेकर जी, नामदेवराव खडसे व गावकरी उपस्थित होते .

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: