Sunday, December 22, 2024
Homeराज्यविश्रामबाग चौक पै. प्रकाश हॉटेल ते गेस्ट हाऊस ते जिल्हा मध्यवर्ती बँक...

विश्रामबाग चौक पै. प्रकाश हॉटेल ते गेस्ट हाऊस ते जिल्हा मध्यवर्ती बँक पर्यंतच्या सर्विस रोड कामास सुरुवात, दीपावली पर्यंत रस्ता पूर्ण होणार – आमदार सुधीरदादा गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे

सांगली महानगरपालिका प्रभाग क्र. १७ मधील डी.सी.सी. बँक ते जल भवन रस्ता करणे व प्रभाग क्र.१९ मधील विश्रामबाग चौक ते पै. प्रकाश हॉटेल ते गेस्ट हाऊस पर्यंतचा रस्ता करणे या १ कोटी ६० लाख रुपये किमतीच्या कामांचे शुभारंभ आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या रस्ता मंजुरीसाठी अनेक नागरिकांची मागणी होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून नगरविकास मधून विशेष बाब म्हणून या रस्त्यास मंजुरी मिळवून १ कोटी ६० लाख निधी मंजूर करून घेतला.

सदर सांगली मिरज रोड कडे जाणारा सर्विस रस्ता असून या रस्त्यामुळे मुख्य रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रभाग क्र १७ व प्रभाग क्र १९ मधील नगरसेवक व नागरिक अत्यंत समाधानी आहेत. लोकांची मागणी व गरज लक्षात घेऊन वेळोवेळी आमच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे.

व यापुढे हि हि असेच आमच्या समस्या सोडवाल अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी शुभारंभ प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ यांचे आभार मानून सत्कार केला. सदर रस्ता दीपावली पर्यंत लवकर पूर्ण करणेकरिता तसेच रस्ता उत्कृष्ट दर्जाचा करण्याचे सूचना संबधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले.

यावेळी लोकसभा प्रभारी शेखर इनामदार, मनोहर सारडा, माजी महापौर गीताताई सुतार, दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, राजेंद्र कुंभार, स्वातीताई शिंदे, सविता मदने, कल्पना कोळेकर, गीतांजली ढोपे पाटील, योगेश कापसे, राहुल ढोपे-पाटील, अमित गडदे, चंद्रकांत घुनके, प्रीती मोरे,

माधुरी वसगडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, शाखा अभियंता राजेंद्र इंगळे, ठेकेदार दादासाहेब गुंजाटे, गणपती साळुंखे, संजय देसाई, कुंटे डॉ. संजय नीटवे, सुनील मानकापुरे,

अजय मानकापुरे, भीमराव नवलाई, प्रकाश गीनमुख, जयंत माने, पाटणकर काका, लिमये काका, शुभम अवघडे, वीरेंद्र नागमोती आदी मान्यवर व नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: