सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील विजयनगरातील कोर्टाच्या इमारतीच्या समोर असणारी गोविंद प्लाझा ही इमारत ओपन स्पेस, नैसर्गिक नाला, तसेच विहिरीवर बांधण्यात आली असून, जी.पी डेव्हलपर्सने हे काम अनाधिकृतपणे आणि नियमबाह्य पणे केले असून त्यांनी महापालिकेची दिशाभूल करून मान्यता घेतली आहे. महापालिकेनेही कोणतेही पाहणी न करता त्याला परवानगी दिली आहे,
परंतु ही इमारत विहिरीवर बांधली असल्याने भविष्यात त्या आरुन मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ शकते,शिवाय नैसर्गिक नाला वळवल्याने इथल्या स्थानिक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरतंय. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
हरित न्यायालयात तक्रार केली असून हरित न्यायालयाने नोटीसा पाठवल्या आहे.परंतु अजूनही कोणतीही कारवाई न झाल्याने आता या विरोधात हायकोर्टात तक्रार दाखल केली असून हायकोर्टानेही यांना नोटीस काढल्या असल्याची माहिती प्रकाश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.दरम्यान नाला होता तसा हवा ,विहिरीतील बांधकामाबाबत कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी प्रकाश चव्हाण यांनी केली.