सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
सांगलीतील कोर्टा समोरील इमारत सांगली कोर्टासमोरील इमारती बाबतीत कारवाई लांबल्याने परिसरातील नागरिक प्रकाश चव्हाण यांनी 24 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
सांगली कोर्टा समोरील इमारत ही विहिरीवर आणि नाल्यावर अतिक्रमण करून बांधली गेल्याने ही इमारत धोकादायक आहे, शिवाय सदर इमारत ही नाल्यावर बांधली गेल्याने दर पावसाळ्यामध्ये या नाल्याचे पाणी इथल्या स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये शिरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीरपणे बांधकामावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आजपर्यंत केलेला पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीचे निवारण आजपर्यंत झालं नसल्यानं नाईलाजाने प्रशासना विरोधात दिनांक 24 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा इथले स्थानिक नागरिक प्रकाश चव्हाण यांनी दिलाय. हॉटेल महालक्ष्मी मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, जोपर्यंत कारवाई होणार नाही ,तोपर्यंत मी जागेवरून हलणार नाही असा इशाराही चव्हाण यांनी पुढे बोलताना दिला आहे.