अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, मागील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ‘कॉफी पे चर्चा’ झाली आणि राजकीय चर्चेला उधान आलं होत. तर आता अकोल्यात अजित पवार गटाच्या विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ‘चाय पे चर्चा’ रंगल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधान आलाय. तर यावर एड.प्रकाश आंबेडकर यांनी ही राजकीय चर्चा नसल्याचे म्हटल आहे.
आज अकोल्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात आंबेडकरांच्या यशवंत भवन या निवास्थानी भेट घेतलीय. या दोघानामध्ये सुमारे 40 मिनिट चर्चा सुरु होती. सुरू असलेल्या या चर्चेची मिडीयावर बातम्याही आल्यात, तर यावर आमदार अमोल मिटकरी यांनी बंद दाराआड चर्चा सामाजिक विषयांवर झाल्याच म्हंटलय. आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आंबेडकरांना भेटण्यासाठी आलो असही मिटकरी म्हणाले. तर शरद पवार आणि आंबेडकरांच्या भेटीचा आणि या भेटीचा कोणताही संबंध नसल्याचं ही ते म्हणाले.
आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर एड.प्रकाश आंबेडकरांनी ही चर्चा कोणतीही राजकीय नसल्याचं आंबेडकरांनी म्हंटलंय तर चॅनल वाले TRP साठी काही ही बातम्या लावतात असंही आंबेडकर म्हणाले. आहे मात्र ही बैठक राजकीय? की खाजगी याची चर्चा आता राज्यात चांगलीच रंगलीय. येणाऱ्या लोकसभेसाठी राज्यभरात वंचित कडून संपूर्ण जागेवर निवडणूक लढण्याचे घोषित केले होते.