Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनAdipurush | प्रभासचा चित्रपट 'आदिपुरुष' या दिवशी प्रदर्शित होणार...

Adipurush | प्रभासचा चित्रपट ‘आदिपुरुष’ या दिवशी प्रदर्शित होणार…

Adipurush – प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. टीझर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हा चित्रपट 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. त्याचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचा ट्रेलर ९ मे रोजी प्रदर्शित होऊ शकतो.

एवढेच नाही तर ट्रेलर रिलीज होण्याच्या एक दिवस आधी 8 मे रोजी हैदराबादमध्ये निर्मात्यांकडून एक स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे, जिथे प्रभासच्या चाहत्यांना आदिपुरुषचा ट्रेलर दाखवला जाईल.

आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यापासून त्यावरून वाद सुरू झाला आहे. कधी रावणाच्या रूपावरून, कधी हनुमानाच्या तर कधी रामाच्या रूपावरून जोरदार वादविवाद व्हायचे. तर दुसरीकडे रामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुषचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आल्याने बराच वाद झाला आणि तक्रारीही झाल्या.

यानंतर हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हनुमानजींचा लूक समोर आला तेव्हा त्यावरही बराच गदारोळ झाला. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सर्व वादांच्या पार्श्‍वभूमीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो, हे जाणून घेणं खूप रंजक ठरणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: