Monday, December 23, 2024
Homeराज्यकरजगाव फिडरची वीज हानी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त...

करजगाव फिडरची वीज हानी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त…

वीज चोरी मोहिमेदरम्यान अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास गुन्हा दाखल करणार

अमरावती जिल्ह्यात महावितरणच अचलपुर विभागाअंतर्गत असलेल्या करजगाव फिडरवर होत असलेल्या वीज चोरीमुळे फिडरचीहानी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे. मागील दोन महिन्यात या वाहिनीवरील ९२ ग्राहकांनी १९ लाख रूपयाची वीज चोरी केल्याचे उघड करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरू असलेल्या मीटर तपासणी मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.

करजगाव फिडरवर होत असलेल्या वीज चोरीची महावितरणच्या मुख्य कार्यालयानेही दखल घेत वीज हानी कमी करण्याच्या निर्देश देण्यात आले आहे.त्यामुळे अचलपुर कँप उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात सतत वीज चोरी मोहिम राबविण्याचे तसेच ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्याचे अधिक्षक अभियंता कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

त्यानुसार सप्टेंबर २०२२ पासून मोहिमेदरम्यान ९२ ग्राहकांकडून १ लाख ४६ हजार युनिट, १९ लाख रूपयाची वीज चोरी केल्याचे उघड करण्यात आले आहे. परंतू काही ग्राहकांकडू या मोहिमेला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून उपकार्यकारी अभियंता व त्यांच्या पथकावर खोटे आरोप लावून मारहान करण्याचे समोर आले आहे.

सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नाला वीज चोरीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. वीज चोरीमुळे शॉर्ट सर्कीट होणे,वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,काही वेळेला महावितरणची यंत्रणा निकामी होण्याचे प्रकार घडतात.याशिवाय महावितरणला मोठ्या आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे महावितरणच्या मोहिमेदरम्यान अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहकांकडून खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नये,त्यासाठी महावितरणकडून न्यायालयीन लढाई लढण्यात येयील.महावितरण प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठिशी असल्याचे आवाहन अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: