Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीगरिबीने घेतला जीव - विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या...

गरिबीने घेतला जीव – विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या…

हुशार मुलीने संपले जीवन… राहत्या घरी केली आत्महत्या.

गुरवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली घटना.—संजना संजय सातपुते असे विद्यार्थिनीचे नाव.

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील संजना संजय सातपुते वय वर्ष 20 या विद्यार्थिनीने गुरवारी रात्री 11.30 सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरवारी सध्याकाळी घरातील सर्व जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. संजना व तिची लहान बहीण बाजूच्या रूम मध्ये झोपली होती. संजना च्या लहान बहिणीला 11.30 सुमारास जाग आला असता तिला संजना तिच्या रूममध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. ही माहिती तिने आई व वडिलांना दिली असता त्यांनी रूम मध्ये जाऊन बघितले तर संजना छताला लटकलेल्या अवस्थेत होती.

या बाबत घरच्यांनी झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृहात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जोगेकार करीत आहे. संजना शिक्षणात अतिशय हुशार मुलगी होती. घरची परिस्थिती साधारण होती. ती कामाला जाऊन आपले शिक्षण पूर्ण करत होती. ति वरूड येथे शिक्षण घरी होती.

त्याच प्रमाणे तिला काटोल येथे कॉम्प्युटरचे क्लासेस करायचे होते परंतु पैसे नसल्यामुळे ती क्लासेस करू शकली नाही. त्यामुळे ती नेहमी चिंतेत असायची ती नेहमी आई वडिलांना म्हणायची मला नोकरी लागू द्या मी सर्व ठीक करेल असे ती नेहमी म्हणायची. कामाला जाऊन ती शिक्षण घेत होती. शिक्षणात अत्यंत हुशार होती.

ADS

तीन दिवसांपूर्वी तिने निराशेतून काही कागदपत्रे सुध्दा पेटवली. घरची परिस्थिती व पैशांची अडचण त्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचले अशी चर्चा आहे. गरिबीने तिचा जीव घेतला असे बोलल्या जात आहे. फोटो ओळी. आत्महत्या करणारी संजना सातपुते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: