काँग्रेस चे उमेदवार संतोषसिंग रावत अडचणीत येणार..?
चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 360 पदांबाबत काढलेल्या फसव्या जाहिरातीची व बैंक व्यवस्थापनानी आचारसंहितेत घेतलेल्या निर्णयाची चौकशी करण्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे.
डॉ. गावतूरे यांनी 360 पदांची नोकर भरतीसाठी परीक्षा जाहीर करणारे संतोष रावत हे बल्लारपूर विधानसभेचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असून या भरतीशी सबंधित कल्याणकर व परीक्षेसाठी ठरवण्यात आलेल्या बोगस एजेन्सी वर गुन्हे दाखल करून नामांकन रद्द करणेबाबत तक्रार करण्यात आली होती.
मध्यवर्ती बँकेच्या 360 पदांबाबत काढलेल्या जाहिरातमध्ये ज्या पद्धतीने सगळे नियम धाब्यावर बसवून नौकर भरतीची प्रक्रिया सुरु आहे व ऐन निवडणूकीच्या आचारसहिंता काळात नियमबाह्य ITI या एजन्सी ला काम देऊन व या कंपनीचा जाहिरात मध्ये उल्लेख केल्याने नोकरभरती करताना उमेदवारांना संपर्क साधन्यास वाव देऊन गोपनीयतेचा भंग होत असल्याने या बैंकेत होणाऱ्या नौकर भरतीत मोठा घोळ सुरु असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दिनांक 15 व 16 नोव्हेंबर 24 ला आचारसंहितेत परीक्षा घेण्याचे जाहीर करून आचारसंहितेचा भंग झाल्याने गुन्हे दाखल करून उमेदवार संतोषसिंग रावत यांचे नामांकन रद्द करावे,अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली होती.या एकूण प्रक्रिये मुळे रावत हे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.