पातूर – निशांत गवई
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मध्ये पोस्टमन काकांनी भेट देऊन हरवलेल्या पत्राची आठवण करून दिली.
९ ऑकटोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. या दिनाचे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी पातूर पोस्ट विभागातील पोस्ट मास्टर हरिष घुगे, सहाय्यक पोस्ट मास्टर बाजड, आणि पोस्टमन सोनोने, पजई आदी मान्यवरांचा सत्कार शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केला.
याप्रसंगी पोस्टाच्या कालबाह्य होत असलेल्या पोस्टाच्या पत्राची संपूर्ण माहिती विषद केली. पोस्टमन आणि पोस्ट विभाग थेट शाळेत आल्याने त्यांना हरवलेल्या पत्राची जणू आठवण झाली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी प्रास्ताविक मधून उपक्रमाचे उदिष्ट विषद केले. तर पोस्ट मास्टर हरिष घुगे यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट विभागाच्या विविध सेवेची माहिती दिली. संचालन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी केले. तर आभार निकिता भालतीलक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठीमुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबळराव, अविनाश पाटील, हरीश सौंदळे, उमेर अहमद, रविकिरण अवचार, नीतू ढोणे, प्रियंका चव्हाण, योगिता देवकर, नयना हाडके, लक्ष्मी निमकाळे, तृप्ती पाचपोर, प्रीती हिवराळे,निकिता भालतिलक,शितल जुमळे, अश्विनी वानेरे, शानू धाडसे , रूपाली पोहरे, शुभम पोहरे यांनी परिश्रम घेतले आदींनी परिश्रम घेतले.