चोरीसह पोस्टर्स फाडण्याचेही प्रकार. अज्ञात ‘चोरट्यां’विरूद्ध शरद पाटील झांबरेंची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार.
अकोला – होऊ घातलेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आणि ‘पदवीधर युवा शक्ती असोसिएशन’चे अध्यक्ष शरद पाटील झांबरे यांचे अकोला शहरातील पोस्टर्स-बॅनर्स चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यासोबतच काही भागातील त्यांचे बॅनर्स फाडल्याचे प्रकारही समोर आले आहेत. गेल्या महिनाभरात अकोला शहरातील विविध भागात हे प्रकार घडले आहेत. अखेर या प्रकारांविरोधात शरद झांबरे यांनी या प्रकारांविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
हे प्रकार अकोला शहरातील सिव्हील लाईन, रामदासपेठ, खदान आणि डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडले आहेत. झांबरे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबतच प्रत्येक पोलीस स्टेशनलाही या प्रकारांची स्वतंत्र तक्रार केली आहे. हे करणार नेमकं कोण आहे?. या प्रकारांचा बोलविता कोण आहे?, हे लवकर शोधण्याची विनंती झांबरे यांनी पोलिसांकडे केली आहे.
अकोल्यात या प्रकाराला नोव्हेंबर महिन्यात सुरूवात झाली. सर्वात आधी झांबरे यांनी मतदार नोंदनीचं आवाहन करणारे जठारपेठ भागातील होर्डींग्ज अज्ञातांनी फाडलेत. त्यानंतर असेच प्रकार सिव्हील लाईन आणि डाबकीरोड भागात झालेत. यानंतर शहरातील विविध भागांतील झांबरे यांचा प्रचार करणारे बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डींग्ज चोरीला जाण्याचे प्रकार वाढलेत. हे घडवून आणणारे ‘मास्टर माईंड’ गावातीलच ‘काही लोक’ असल्याचा संशय झांबरे यांना आहे.
चोरी आणि फाडल्या गेलेल्या सर्व बॅनर्स, होर्डींग्जची महापालिकेकडून रितसर परवानगी झांबरे यांनी घेतली होती. याचं रितसर शुल्कही त्यांनी महापालिकेकडे भरलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत सध्या शरद झांबरे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात मोठा रोष सध्या मतदारांमध्ये दिसतो आहे.
यातूनच झांबरे यांना वाढता पाठिंबा लक्षात आल्यानंच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोप झांबरे यांनी केला आहे. याचे ‘मास्टर माईंड’ लवकरच पुराव्यांनिशी समोर आणू असं झांबरे यांनी स्पष्ट केलं आहे. हे अतिशय खालच्या प्रतीचं राजकारण असल्याचं झांबरे समर्थकांना वाटतं. यातील दोषींना पोलिसांनी लवकर समोर आणावं, अशी अपेक्षा झांबरे समर्थकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या मैदानात लढा, अशा ‘पाणचटपणा’ला आता जनताच उत्तर देईल : शरद पाटील झांबरे.
मला मिळत असलेला पाठिंबा पाहून आता विरोधक घाबरले आहेत. त्यातूनच असे ‘उद्योग’ काही लोक करीत आहेत. लोकांनाही ‘ते’ कोण आहेत, याची चांगलीच जाण आहे. मात्र, स्वत:ला ‘संस्कारी’ म्हणवून घेणारे कसे आहेत, हे सांगणारे हे प्रकार आहेत. यामागचे ‘मास्टरमाईंड’ लवकरच समोर आणणार आहे.
अन या अतिशय खालच्या प्रकारच्या राजकारणाचं उत्तर आता अमरावती विभागातले पदवीधर मतदारच देतील. पोलिसांनी लवकर दोषींवर कारवाई करावी ही विनंती. शरद पाटील झांबरे, उमेदवार आणि अध्यक्ष, पदवीधर युवा शक्ती असोसिएशन.