मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
स्थानिक श्री गाडगे महाराज कॉलेज मधे दोन वर्षा पासुन एम ए मधे शिक्षण घेत असलेली पूनम कैथवास हिने भारतातील सर्वोच असलेल्या नैशनल गेम गुजरात येथे संपन्न झालेल्या बॉक्सिंग या खेळात सम्पूर्ण महाराष्ट्र मधुन आलेल्या खेळाडूंना हरवुन पहिले स्थान पटकावले आणी महाराष्ट्र च्या संघात ५७ किलो वजन गटात आपले स्थान निश्चित करून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातुन येऊन इतिहास घडविनारी पहिली खेळाडू ठरली आहें आणी हे मूर्तिजपुर तालुक़ा करीता अत्यंत अभिमानाची बाब आहे.
गाडगे महाराज महाविद्यालया च्या क्रीड़ा विभागात स्पोर्ट्स डिरेक्टर डॉक्टर राकेश बडगुज़र यांनी सत्काराचे आयोजन केले असुन डॉक्टर अमिता तिड़के मैडम यांच्या शुभहस्ते पूनम कैथवास या विद्यार्थिनीचें शाल श्रीफळ आणी स्मृति चिन्ह देयून सत्कार केला त्याच सोबत बॉक्सिंग कोच आणी नवं निर्वाचीत मूर्तिजापूर तालुक़ा क्रीड़ा अधिकारी श्री सतीश भट्ट यांचाही शाल श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देयून डॉक्टर राकेश बडगुज़र यानी स्वागत केले आणी पूनम कैथवास यानी आपल्या यशाचें श्रेय डॉक्टर राकेश बडगुज़र यांना दिले आहे.
यावेळी कार्यक्रमास कॉलेज चें डॉक्टर नितिन सातपुते, डॉक्टर सचिन मातोड़े, दिलीप शाहाडे, सतीश बेंद्रे , बाळासाहेब सरोदे, अक्षय चव्हाण , डॉक्टर रीता देशमुख आणी मूर्तिजपुर तालुक़ा क्रीड़ा अधिकारी ऑफ़िस चें सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटील कार्यक्रमचे आभारप्रदर्शन स्पोर्ट्सडिरेक्टर डॉक्टर राकेश बडगुज़र यांनी केले.