Sunday, December 22, 2024
Homeराजकीयरामटेक तालुक्यात मतदान शांततेत...तालुक्यातील ८ ग्रामपंचायतमध्ये होती निवडणुक...

रामटेक तालुक्यात मतदान शांततेत…तालुक्यातील ८ ग्रामपंचायतमध्ये होती निवडणुक…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यात सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली . सकाळी पाहिजे त्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही . सकाळी ११.३० वाजता पर्यंत २१.३२ % मतदान झाले होते.

दुपारनंतर मात्र मतदानाची गती मंदावली . दुपारी १.३० वाजता ३८.६३ टक्के मतदान झाले . त्यानंतर मतदानाने गती पकडली त्यानुसार दुपारी ३.३० वाजता ५७.८९ टक्के मतदान झाले होते . मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रामटेक पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. संपुर्ण आठही ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एकुण मतदान ७२.९० % एवढे झाले.

त्यामध्ये आज मी येथे १२५७ मतदारांपैकी एकूण १०८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे ८८.६७ % मतदान झाले. तर आसोली येथे ५७६ मतदारांपैकी ४८१ मतदारांनी मतदान केले. येथे ८३.५१ % मतदान झाले. नगरधन येथे ६१७३ मतदारांपैकी ४७२३ मतदारांनी मतदान केले. येथे ७६.५१ % मतदान झाले. मुसेवाडी येथे ९०६ मतदारांपैकी ७११ नागरीकांनी मतदानाचा हक्क बजाविला. येथे ७८.४८ % मतदान झाले.

भिलवाडा येथे ७६७ मतदारांपैकी ६५० नागरीकांनी मतदान केले. येथे ८४.७५ % मतदान झाले. हिवरा हिवरी येथे ८१८ मतदारांपैकी ६४३ नागरीकांनी मतदान केले. येथे ७८.६१ % मतदान झाले. पटगोवारी येथे २६१६ मतदारांपैकी १८७२ नागरीकांनी मतदान केले. येथे ७१.५६ % मतदान झाले. मनसर येथे ५९०५ मतदारांपैकी ३६७४ नागरीकांनी मतदान केले. येथे ६२.२२ % मतदान झाले. असे सर्व ८ ग्रामपंचायत मिळुन एकुण ७२.९० % मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी माहीती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: