रामटेक – राजु कापसे
रामटेक शहरासह तालुक्यात आज दि. १९ एप्रील ला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. उन्हाचे तपतपते स्वरूप पाहुन विशेषता सकाळी तथा दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.
सकाळी ११.३० वाजता पर्यंत मतदान केंद्रावर गर्दी दिसुन आली मात्र दुपारच्या सुमारास मतदानाची गती मंदावली . दुपारी ५ वाजतापर्यंत ५९ % मतदान झाले असल्याची माहिती तहसिलदार रमेश कोळपे यांनी दिली. मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रामटेक पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. माहिती लिहेस्तोवर निवडणुक निर्णय अधिकारी तथा संबंधितीत अधिकाऱ्यांनी सविस्तर व पुर्ण माहिती पुरविली नव्हती. दुपारी ५ नंतर उर्वरीत वेळेत ६५ % पर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.