शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
राष्ट्रवादी चे माजी आमदार आणि सध्याचे शिवसेना नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग बरोरा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संसार थाटणार असल्याचे वृत्त आहे. पांडुरंग बरोरा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वसर्वा शरद पवार यांना भेटून पक्षात प्रवेश करणार आहेत.
एका खाजगी वहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान बरोरा यांनी हे वक्तव्य केलं आहे. शहापूर चे माजी आमदार स्व. म. ना. बरोरा यांचे आणि शरद पवार यांचे गेल्या 40वर्षाचे संबंध होते.. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बरोरा हे शिवसेना पक्षात गेले.. आणि मागील वर्षी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले..
परंतु आता राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलो ती आपली एक प्रकारे चूक होती आणि आता तालुक्यातील जनतेची, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची माफी मागत आपण शरद पवार यांच्या सोबत जाणार आहोत असे वक्तव्य पांडुरंग बरोरा यांनी केलं आहे.. आता शहापूर तालुक्यातील राजकारण आता कोणतं निर्णायक वळण घेईल हे येणारा काळ ठरवेल .. असं चित्र दिसू लागलंय..