Politics : काल मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्वच दिगग्ज नेते उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाचा ठोस निर्णय झाला नसला तरी पुढील बैठकीत हा तिढा सुटणार असल्याचे बोलल्या जातेय. मात्र कालच्या बैठकीतून वंचित चे प्रकाश आंबेडकर हे लवकरच निघून गेल्याने युतीबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती. मात्र 4 तास खलबतं करुनही अंतिम फॉर्म्युला काही महाविकास आघाडीनं जाहीर केलेला नाही. मात्र महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युल्यावर सहमत झाल्याचे वृत्तवाहिनी tv9 सांगते.
यातील पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना 23 जागा, काँग्रेस 15 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळू शकतात. हा फॉर्म्युला मविआतील 3 प्रमुख पक्षांचा आहे. आता जर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी सोबत आलीच तर दुसरा फॉर्म्युल्यानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात. असे tv9 ने दिलेल्या वृतात म्हटले आहे. तर वंचितच्या हा प्रस्ताव मान्य नसल्याने म्हणूनच प्रकाश आंबेडकर बैठकीतून निघून गेले असले तरी पुढील बैठकीत आणखी एक जागा वंचितला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील आंबेडकरी जनतेला वाटते की महाशक्तीचा पराभव करण्यासाठी वंचीतने महाविकास आघाडी सोबत जावे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत वंचितचा फॅक्टर महाविकास आघाडीसाठी किती महत्वाचा आहे हे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीतुन स्पष्ट दिसते. लोकसभेच्या 9 मतदारसंघात वंचितमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट फटका बसला. दीड लाखांच्या वरच वंचितनं मतं घेतल्यानं आघाडीचे उमेदवार पडले. 2019च्या विधानसभेतही 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं. 32 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं हरले आणि याच 32 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारांहून अधिक मतं घेतली.
मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर उपस्थित राहूनही तोडगा निघाला नाही मात्र 9 तारखेला आणखी एक बैठक होणार आहे. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरही हजर राहतील. त्यानंतर वंचितबद्दल फुल अँड फायनल निर्णय होईल.