Monday, December 23, 2024
Homeराजकीयमिरजेत १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून कामगारांचा...

मिरजेत १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून कामगारांचा सत्कार…

सांगली – ज्योती मोरे

एक मे कामगार दिन तथा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जैलाब शेख तसेच ह्युमन वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल वहाब मुजावर आणि बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष आणि दर्पणकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कुकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरज महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

यावेळी विनोद कांबळे,अनिकेत कांबळे,विजय कांबळे,सचिन कांबळे,संदीप सातपुते,अनिल दरवारे,आकाश मद्रासी,राहुल सातपुते,विजय महिषाळे,सुधाकर वाघमारे,नरेंद्र भंडारे,विशाल लोंढे,विकास लोंढे, अविनाश मेहकर,अंतिरा अवधूत सादर,रामदास कांबळे,शशिकांत घाडगे,

हुसेन मुतवली,मंगल वारे, शोभा कांबळे,कल्पना लोंढे,आदि स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी कामगार दिन व महाराष्ट्र दिनांचा जयघोष करून कामगारांसोबत कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व सफाई कामगारांनी सत्कारानंतर सर्वांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: