Saturday, November 23, 2024
Homeराजकीयराजकीय पक्ष, उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी नव्याने खाते उघडावे लागणार : बँकानी रोख...

राजकीय पक्ष, उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी नव्याने खाते उघडावे लागणार : बँकानी रोख रक्कम हस्तांतरणासाठी क्युआर कोड तयार करावेत…

नांदेड – महेंद्र गायकवाड

निवडणूक आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष/अपक्ष यांचे उमेदवारांना निवडणूक खर्चाचे नव्याने खाते उघडून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी नवीन खाते उघडून खर्च त्या खात्यातून करावा.

उमेदवारांनी खर्च सादर करतांना भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार खर्च सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांसोबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने,

मनपाचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दनन पक्वाने, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आणि 25 बँकचे व्यवस्थापक, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती होती.

सर्व राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी लागणारा सर्व खर्च नव्याने उघडण्यात आलेल्या खात्यामधून करावा लागेल. उमेदवारांना खर्च सादर करतांना भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सादर करावा लागेल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

तसेच कॅश व्हॅन सोबत असलेल्या आउटसोर्स एजन्सी कंपन्याच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित एजन्सीने जारी केलेले ओळखपत्र, आदेश सोबत ठेवावेत. निवडणुका दरम्यान बँकाकडून रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी सर्व बँकानी क्युआर कोड तयार करुनच रोख रक्कम हस्तांतरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व बँकानी व राजकीय पक्ष, उमेदवारांनी कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: