Monday, December 23, 2024
Homeराज्यपोलिस वाहनाला अपघात…सुदैवाने जीवित हानी टळली…बाळापूर-पातूर रोडवर बाभूळगाव नजीकची घटना…

पोलिस वाहनाला अपघात…सुदैवाने जीवित हानी टळली…बाळापूर-पातूर रोडवर बाभूळगाव नजीकची घटना…

पातूर : बाळापूर – पातूर रोडवर असलेल्या बाभूळगाव नजिक बाळापूर कडून पातूरकडे येत असलेल्या पोलीस जीपचे टायर फुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

भारत जोडो यात्रेच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस जवानांना जेवणाचे डबे घेऊन बाळापूर कडून पातूरकडे येत असलेल्या पोलीस जीप क्र.- एमएच 30 एच 506 चे कंडक्टर साईडचे मागचे टायर अचानक फुटल्याने सदर वाहनाने तीन पलट्या खाऊन रोडच्या कडेला असलेल्या कॅनव्हल मध्ये जाऊन पडल्याने गाडी मध्ये असलेले पोलीस मुख्यालय अकोला येथे कार्यरत पोलीस कर्मचारी सुनिल सुखदेव वाघ (वय 45), आश्वजित सरदार (वय 22), उमेश सानप (वय 42), कुंदन इंगळे (वय 44) हे जखमी झाले असून पातूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले होमगार्ड सैनिक गजानन घेघाटे (वय 51), चालक संजय सिरसाट(वय 40), मो.यासीर (वय 37) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांचेवर प्राथमिक आरोग्य केंद्र बाभूळगाव येथे उपचार सुरू आहेत.

सदर घटनेमध्ये पोलीस वाहनाने तीन पलट्या खाऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: