Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीपोलीस उपनिरीक्षक व पोलीस नायकास केले जेरबंद...अमरावती ACB ची कारवाई...

पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नायकास केले जेरबंद…अमरावती ACB ची कारवाई…

दहीहंडा तालुका आकोट जिल्हा अकोला ह्या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चोहोट्टा बाजार येथील पोलीस चौकी समोर लाच स्वीकारताना एका पोलीस उपनिरीक्षकास अमरावती एसीबी पथकाने रंगेहाथ अटक केली. सोबतच एका पोलीस नायकासही पथकाने अटक केली आहे.

घटनेची हकीकत अशी की, दिनांक 25 ऑगस्ट रोजी तक्रारदार याने लाच प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडे तक्रार दिली की, गांधीग्राम येथे अवैध देशी दारू विकू देणे करिता रवी राजधर इंगळे पोलीस नाईक पोलीस स्टेशन दहीहंडा यांनी लाच मागितली असून पोलीस उपनिरीक्षक भारत सखाराम सोळंके यांनाही लाच देणे बाबत आपणास सांगितले आहे. या तक्रारीवरून लाच प्रतिबंध विभाग अमरावती यांनी पडताळणी करून तक्रार खरी असल्याची खात्री करून घेतली.

त्यानंतर तक्रारदार व रवी इंगळे यांचेत तडजोड होऊन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार छोटा पोलीस चौकी समोरील माऊली टी सेंटर जवळ हे हजार रुपये स्वीकारताना भारत सखाराम सोळंके पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे दहीहंडा ह्याला लाच प्रतिबंधक पथक अमरावती यांनी रंगेहाथ अटक केली. त्या पाठोपाठ रविराज इंगळे पोलीस नायक पोलीस स्टेशन यासही अटक करण्यात आली. दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग अमरावती, अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. केतन मांजरे, पो.नि.प्रविणकुमार पाटील, पोना. राहुल वंजारी, पोना. निलेश मेहंगे, चा.प्र.पो.उ.नि.सतीष किटुकले यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: