नांदेड – महेंद्र गायकवाड
दिनांक 20 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक साहेब, यांचे आदेशाने जिल्हयात व नांदेड शहरामध्ये हत्यार वापरून गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणेकरीता नाकाबंदी ऑलआउट ऑपरेशन करण्याबाबत आदेशीत केल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री चंद्रसेन देशमुख व पोलीस निरीक्षक श्री आर.सी. वाघ पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली नाकाबंदी व ऑलआउट आपरेशन राबविण्यात आले.
सदरील नाकाबंदी व ऑलआउट ऑपरेशन चालु असतांना गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जनता कॉलनी येथील सार्वजनीक रोडवरून संशयीत इसम नामे उत्कर्ष प्रमोद सुर्यवंशी वय २० वर्ष यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक बनावट गावठी पिस्टल ज्यामध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यास गावठी पिस्टलचे हत्यारासह ताब्यात घेवुन त्याचेवर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.न १६ / २३ कलम ३ / २५ भा.ह. का प्रमाणे गुन्हा दाखल करून चांगली कामगीरी केली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री अविनाश कुमार, व उप विभागीय पोलीस अधिकारी मा.श्री चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक श्री आर. सी. वाघ पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व अमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे यांनी पार पाडली.