खामगाव शहरात काही भागात मानवी जीवितास व अन्य जीवितास हानिकारक असणारा नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची माहिती खामगाव पोलिसांना मिळाली या माहितीवरून वरिष्ठांच्या आदेशाने खामगाव पोलिस डीबी पथक मोहन करूटले, दिनेशसिंग इंगळे, गणेश कोल्हे, राम धामोडे, अरविंद कोकाटे, आमरदीपसिंह ठाकूर, प्रफुल टेकाळे, वसतकार, हिवाळे यांनी स्थानिक मोची गल्लीतील नायलॉन मांजा विक्री करणारे 1) महेश दिनेश पवार 2) मुकेश चंपालाल चव्हाण 3) रतन चंपालाल चव्हाण 4) जितेंद्र उत्तमचंद गोयल 5) सुनील अमरचंद पवार यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून मानवी जीवितास व अन्य जीवितास हानिकारक असणारा Not Use For Kite Flying असे नमूद असलेला नायलॉन मांजा 33040 रु जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 336 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक बुलढाणा, मा अपार पोलीस अधीक्षक खामगाव, मा उपविपोअ खामगाव, यांचे मार्गदर्शनात पो नि प्रदीप त्रिभुवन पोस्ट खामगाव शहर यांचे आदेशाने डीबी पथक मोहन करूटले, दिनेशसिंग इंगळे, गणेश कोल्हे, राम धामोडे, अरविंद कोकाटे, आमरदीपसिंह ठाकूर, प्रफुल टेकाळे, वसतकार, हिवाळे यांनी केली
तसेच खामगाव पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले की येणाऱ्या मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांज्या चा वापर करू नये