सांगली प्रतिनिधी :–ज्योती मोरे
गोपनीय माहितीच्या आधारे सांगलीतील गोकुळ नगर वेश्या वस्तीतून एका बांगलादेशी महिलेची सुटका करण्यात सांगलीतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा आणि सांगली पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान सांगलीतील गोकुळ नगरात एका बांगलादेशी महिलेस जबरदस्ती आणून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्मचारी तसेच सरकारी पंचांसह छापा टाकून सदर महिलेची सुटका केली आहे.
जबरदस्तीने आणून व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली एका महिलेस ताब्यात घेतले तर संशयित महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच सदर कारवाईत मिळून आलेल्या महिलांपैकी एक महिला ही यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात मानवी हक्क वाहतूक प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात सुधार गृहातून पळून गेलेली आहे.
याबाबत अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी हे करत आहेत.