११० जागांसाठी आले ८ हजार २६ अर्ज पोलिस भरती प्रक्रिया जवळ जवळ १७ दिवस चालणार
एकोडी – महेंद्र कनोजे
गोंदिया, दि. १८ जुन 2024 : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक पदाची पोलिस भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होत असून ११० पोलिस कर्मचारी जागांसाठी ८ हजार २६ उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले आहेत. पोलिस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलिस मुख्यालयाच्या विविध ग्राऊंडवर ७० कॅमेरे लावण्यात आले आहेत.
हे कॅमेरे पोलिस भरतीची प्रत्येक बाब टिपणार असल्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले. गोंदिया जिल्हा पोलिस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलिस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे १९ जून २०२४ रोजी सकाळी ५ वाजतापासून घेण्यात येणार आहे.
आमिष देणाऱ्यांचे नाव डायल ११२ वर सांगा पोलीस अधीक्षकांचे आवाहन…
पोलिस भरती संदर्भात वशिला लागत असल्याच्या भूलथापा कुणी देत असेल तर त्या व्यक्तीचे नाव जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावे, पोलिस अधीक्षक गोंदियाच्या ई मेलवर किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. जेणेकरून त्या आमिष देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले. लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्त