पातूर – निशांत गवई
पोलीस दलाच्या वतीने 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता निमवाडी पोलीस वसाहत हॉल येथे जिल्ह्यातील पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे होते.
तर प्रमुख उपस्थिती म्हणून अकोला जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे हे होते तसेच यावेळी अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोतकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक बाळापुर गोकुळ राज, उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर मनोहर दाभाडे व इतर पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.
या मेळाव्याला जिल्ह्यातील एकूण 250 पोलीस पाटील यांची उपस्थिती होती पोलीस पाटील ही गावातली प्रमुख समजल्या जाणारी एक व्यक्ती समजल्या जाते गावातील प्रत्येक घटना प्रत्येक वाद तंटा हा स्थानिक पातळीवर मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस पाटलामार्फत करण्यात येते पोलीस स्टेशन व गाव यांच्यामधील तो दुवा असतो,
त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांचा यथोचित्त सन्मान व्हावा यासाठी व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सदर मेळाव्यात पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदखेड येथील पोलीस पाटील सौ वनिता राजेंद्र बोचरे यांचा अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोतकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील राजू देशमुख, पोलीस पाटील वामन भोकरे, व रामानंद भवाने मेजर यांची तसेच जिल्ह्यातील पोलीस पाटलांची उपस्थिती होती.