Monday, November 18, 2024
Homeराज्यनांदेड शहरात दोन ठिकाणी पॉपीस्ट्रॉ पावडरची विक्री करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस...

नांदेड शहरात दोन ठिकाणी पॉपीस्ट्रॉ पावडरची विक्री करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची कार्यवाही…

नांदेड – महेंद्र गायकवाड

आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक व बाळगणारे आरोपीतांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरुन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने पापीस्ट्रा पावडर विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे.

दिनांक 31मार्च रोजी नगीनाघाट ते बंदाघाट रोडवर एक इसम त्याचे ताब्यात पॉपीस्ट्रॉ पावडर विक्री करत असल्याची गुप्त बातमीदारा कडुन स्थानीक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अमलदार यांना माहीती मिळाल्यावरुन पो. नि. उदय खंडेराय, स्थागुशा नांदेड यांनी सदर माहीती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेड यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता, इसम नामे सुरजसिंह पिता कल्याणसिंह ठाकुर वय 50 वर्ष व्यवसाय मजुरी रा. चिरागगल्ली, इतवारा, नांदेड ता. जि. नांदेड हा मिळुन आला.

त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण वजन 2 किलो 285 ग्राम वजनाचे (POPPY STRAW) पावडर ज्याची एकुण किंमत रु. 11,425/- चा माल जप्त करुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद येथे गुरनं. 156/2024 कलम 8, 17, 20, 22 एन. डी. पी. एस. अॅक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील इतर दोन फरार आरोपीतांचा शोध घेणे चालु आहे.

तसेच दिनांक 1 एप्रिल रोजी पो. नि. उदय खंडेराय, स्थागुशा नांदेड यांना गुप्त बातमी दारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाल्यावरुन, तानाजी नगर, नांदेड येथे एक इसम पॉपीस्ट्रॉ बोंडाचे तुकडे विक्री करीत आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी सदर माहीती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी राजपत्रीत अधिकारी शैलेस दिगांबरराव फडसे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्धापुर यांचेसह जावुन इसम नामे मितसिंघ राजासिंघ मास्तर वय 45 वर्ष व्यवसाय मजुरी रा. नंदीग्राम सोसायटी, पाण्याचे टाकीजवळ,

नांदेड ता. जि. नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण वजन 13 किलो 535 ग्राम वजनाचे (POPPY STRAW चे बोंडाचे तुकडे एकुण किंमत रु. 67,675/- चा माल जप्त करण्यात आला आहे. पो नि उदय खंडेराय यांचे फिर्यादीवरुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे..

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पोउपनि दत्तात्रय काळे, सहापोउपनि माधव केंद्रे, पोहेकों बालाजी तेलंग, पोना विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी यादगीरवाड, रणधीर राजबन्सी, धम्मा जाधव, राजु पुलेवार, किरण बाबर, चालक पोहेकॉ दादाराव श्रिरामे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: