Tuesday, November 26, 2024
Homeराज्यपोलीस निरीक्षक रामटेक यांचे सी. सी. टि.व्ही. कँमेरे लावण्याचे नागरीकांना आव्हान...

पोलीस निरीक्षक रामटेक यांचे सी. सी. टि.व्ही. कँमेरे लावण्याचे नागरीकांना आव्हान…

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्हातील वाढत्या चोरीच्या प्रकार लक्षात घेता पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव पोलीस स्टेशन रामटेक, यांनी जनतेला आवाहन करत दिवाळी सणा निमीत्त बरेचसे नागरीक हे बाहेरगावी गेलेले आहेत, किंवा बाहेर गावी जातात तसेच कंम्पनी मध्ये काम करणारे परराज्याजीय मजुर हे सुदधा आपआपले गावी जातात.

आम्ही सर्व नागरीकांना आव्हान करतो की, जे कुणी नागरीक घरे बंद करुन गावाला जातात, त्यांनी पोलीस स्टेशनला व शेजा-यांना याबाबत माहिती दयावी जेणेकरुन त्या भागात रात्रगस्त प्रभावीपणे करण्यात येईल. तसेच गावाल जात असलेल्या नागरीकांनी त्याचे मौल्यवान वस्तु, दाग-दागीने, रोख रक्कम घरात ठेवु नये ती नातेवाईकांकडे किंव्हा बँकेच्या लॉकर मध्ये सुरक्षीत पणे सांभाळुन ठेवावे.

आम्ही नगरपरिषद रामटेक तसेच पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील पेट्रोल पंम्प मालक, व्यापारीगण व पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या गावातील सरपंच यांना त्याच्या परिसरात सि.सि.टी.व्ही.कॅमेरे लावण्याबाबत विनंती केलेली आहे. त्यामुळे रामटेक तालुक्या होणार्‍या घात-पात वर आळा बसेल.

त्याअनुषंगाने मा. आशित कांमळे सहा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या मार्गदर्शनात बैठकी सुध्दा घेण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही नागरीकांनी चांगलाप्रतिसाद देवुन सि.सि.टि.व्हि. कँमेरे लावलेले आहेत. काही नागरिकांनी लवकरच त्याच्या परिसरात सि.सि.टि.व्हि कँमेरे लावण्याबाबत आश्वाशन सुध्दा दिलेले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: