नांदेड येथील गांधीनगरचे रहिवाशी पो. हेडकॉन्स्टेबल मधुकर पवार यांचे सुपुत्र विक्रम मधुकर पवार यांनी UPSC अंतर्गत एन्फोर्समेंट ऑफिसर ही सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विक्रमने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत बी.एस्सी. बायोटेक्नोलॉजी (इंटिग्रेटेड) ची पदवी संपादन केली आहे.
आपल्या मुलाची स्पर्धा परीक्षांबद्दलची ओढ लक्षात घेऊन मधुकर पवार यांनी विक्रमला आंबेडकरवादी मिशन, सिडको येथील स्पर्धापरीक्षा केंद्राचे प्रमुख दीपक कदम सरांची भेट घडवून आणली. सरांच्या मार्गदर्शनानुसार विक्रमने युपी.एस.सी. ची तयारी सुरु केली. विक्रमने कुठलाही खाजगी क्लास न लावता कॅनरा बँकेत असिस्टंट मॅनेजर हे पद मिळवले. असिस्टंट मॅनेजर हे पद सांभाळून युपीएससीचा अभ्यास विक्रमने सुरु ठेवला. मधुकर पवार यांनी कॉन्स्टेबलच्या पगारात घरखर्च भागवून आपल्या तीनही अपत्यांना उच्च शिक्षण दिले.
पहिली मुलगी शितल मधुकर पवार ही बी.ए. उत्तीर्ण झाली दुसरी मुलगी काजल हीने MIT औरंगाबाद येथून सिव्हिल इंजिनिअर ही पदवी मिळवली. व विक्रमले यु.पी.एस.सी. मध्ये बवघवीत यश संपादन करून आई-वडिलांच्या कष्टांचे मोल केले त्याच्या यशामागे त्याची आई विजयत्री मधुकर पवार यांचाही सिंहाचा वाटा आहे. तसेच, युपीएससी निवड यादी मध्ये विक्रम पवार यांची निवड झाल्याचे कळताच स्वारातीम विद्यापीठ येथील स्कुल ऑफ लाईफ सायन्सेसचे डॉ. गजानन झोरे सरांनी विद्यापीठा कुलगुरु डॉ मा. डॉ. उध्दव भोसले सरांना ही वार्ता कळविली कुलगुरु. 13 ऑगस्ट रोजी विक्रम पवार यांचा जाहीर सत्कार करून विक्रमला भावी वाटचालीसाठी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.