वाशीम जिल्ह्यातील असलेल्या जऊळका पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला २ हजाराची लाच घेतांना वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून शफिक अहेमद रफीक अहेमद खान असे पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. वाशीम ACB च्या लगातार धडाकेबाज ५ व्या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर त्याच्या विरुद्ध पोस्ट जऊळका येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीवरून, ३० वर्षीय तक्रारदार यांचेवर दिनांक 03/07/23 रोजी पोस्टे जऊळका येथे जुगाराचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्यांची जप्त केलेली मोटर सायकल त्यांना परत करण्यासाठी आलोसे यांनी फि यांचेकडे 2000/- रू. ची मागणी केली होती दि.05/07/23 रोजी प्रत्यक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी 2000/- रु ची मागणी करून तडजोडी अंती 1300/-₹ स्विकारण्यास तयारी दर्शवली असल्याने आजरोजीच प्रत्यक्ष सापळा कारवाई शिवाजी हायस्कूल जवळ जऊलका येथे आयोजित केली असता आलोसे यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेचे 1300/-रु स्वीकारले वरून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे आलोसे यांचे विरुद्ध पोस्ट जऊळका येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी
मा.पोलीस अधीक्षक सा. वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. सुजित कांबळे
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
मो. नं.9922243438
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री. सुजित कांबळे पोलीस निरीक्षक
पोहवा राहुल व्यवहारे, नापोका योगेश खोटे,रवी घरत
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक ,
2) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.