वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास व त्याच्या सोबतीला असलेल्या एकाला १० हजारांची घेतांना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून विशाल कुंडलिक ऐकाडे, पद पोहवा बन 818 पो.स्टे.रिसोड जि.वाशिम असे नाव आहे. व संतोष काळदाते ता.जि वाशिम असे दुसऱ्या खाजगी व्यक्तीचे नाव असून दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विरुद्ध पो.स्टे रिसोड येथे दाखल गुन्हयात तक्रारदार यांना मदत करण्याकरिता तसेच पोलीस स्टेशनला जमा असलेली मोटार सायकल व मोबाईल तक्रारदार यांना परत देण्याकरिता पोलीस हवालदार विशाल ऐकाडे यांनी दि.06/02/2023 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान 20,000/- रू. लाचेची मागणी करून 10,000/-₹ स्विकारण्यास तयारी दर्शवली खाजगी इसम संतोष काळदाते यांनी त्यांना सदर रक्कम स्वीकारण्याचे प्रोत्साहन दिले.
दि.07/02/2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र 1 पोलीस हवालदार विशाल कुंडलिक ऐकाडे यांनी पोस्ट रिसोड च्या इमारतीच्या आवारात लाच रक्कम 10000/-₹ पंचा समक्ष स्वीकारले वरून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले दोघांविरुद्ध पोस्ट रिसोड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*सक्षम अधिकारी
आलोसे क्रमांक 1)मा. पोलीस अधीक्षक वाशिम जि वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. महेश भोसले
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
9028200444
पर्यवेक्षण अधिकारी*
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक, पोहवा नितीन टवलारकर,दुर्गदास जाधव, विनोद मार्कंडे, पोलीस नाईक योगेश खोटे, रवी घरत,समाधान मोघड,चापोशी शेख नावेद
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.