आरपीआय खरात गटाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सोहेल इनामदार यांची मागणी…
सांगली – ज्योती मोरे.
सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने सांगली येथे पार पडलेल्या पूर्वनियोजित बैठकीत भाजपाचे पदाधिकारी शहानवाज सौदागर यांनी आपल्या भाषणात मुस्लिम धर्मीयांचे आराध्य दैवत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची तुलना सावरकरांशी केल्याने मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शहानवाज सौदागर यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सोहेल इनामदार यांनी जाहीर निषेध केला आहे.
दरम्यान शहानवाज सौदागर यांच्यावर भाजपाने निलंबनाची कारवाई करावी. त्याचबरोबर पोलिसांनीही मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांखाली कडक कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणीही, सोहेल इनामदार यांनी केली आहे.