Saturday, September 21, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद शाळेच्या आवारात विषारी अळी, विद्यार्थी भयभीत...

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विषारी अळी, विद्यार्थी भयभीत…

वर्गखोल्या नसल्याने,विद्यार्थ्यांना त्रास, शाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा निर्णय

पातूर – निशांत गवई

पंचायत समिती अंतर्गत येत आलेली ग्राम दिग्रस बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रिय शाळेचा आज मोठ्या प्रमाणात विषारी अळ्यांचा पादुर्भाव आढळून आला असल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे यामुळे पालक आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचे शासनाला आव्हान करण्याचे मिडियासोबत सोमवार रोजी बोलले आहे.

दिग्रस बु येथील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख आहे सोबत चांगल्या गुणांमूळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा सुद्धा प्राप्त आहे.तालुक्यातील प्रथम कॉन्व्हेंट सुरू करणारी म्हणून या जिल्हा परिषद शाळेचे नाव घेतल्या जाते.परंतु मागील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पाडल्या होत्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रागणात शाळेतील वृक्षाखाली टेबल खुर्च्या टाकून बसावावे लागत आहे.

परिणामी या शाळेत अळ्यांचा एवढा खच टेबल व खुर्च्यांवर पडलेला दिसून आल्याने गावतील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी दखल घेत या शाळेच्या परिसरात फवारणी करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचवा व तत्काळ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला आहे.

आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे.शाळेत वर्गखोल्या नसतील तर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून शैक्षणिक दर्जा खालावत चालला असल्याचे आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला.आजूनपर्यत कोणीही लक्ष देत नसेल तर शाळा नसलेली बरीच अशी टीका पालक वर्गातून केली आहे.

गावतील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त फक्त नावालाच ठरली आहे.परंतु त्या पध्द्तीने वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.नाईलाजाने मुलांना शाळेच्या बाहेर बसावे लागले आहे.यामुळे शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा पादुर्भाव दिसून आला आहे.

त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद गवई,पोलीस पाटील नितीन गवई,ग्रा प सदस्य नंदन गवई,तुकाराम गवई,सत्यपाल सिरसाट,वैभव गवई, मधुकर गवई,शिवहरी गवई,रवींद्र गवई,अजय तायडे,आत्माराम सोनोने,अशोक गवई,संदेश गवई,मंगेश गोळे,बाळू इंगळे,संदिप गवई,आदी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते..

नंदन गवई पालक दिग्रस बु

या शाळेत शिक्षणासाठी रोज बाहेरगाववरून येणे जाणे करावं लागतं आहे.परंतु या कडे आमदार शिक्षणाधिकारी, लोकप्रतिनिधी व सीईओ यांनी लक्ष देऊन मुलाचे होत असलेले नुकसान टाळावे..

सत्यपाल सिरसाट,पालक
दिग्रस बु

माझ्या मुलीला शाळेच्या आवारात बसवून शिक्षण दिल्या जाते परंतु शाळेतील झाडावरून मुलीच्या अंगावर अळी पडल्याने घाबरून सांगितले मी पाहिले तर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा खच पडलेला होता.यामुळें आमच्या मुलांना काही झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे..

प्रमोद गवई
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य

वर्ग खोल्या नसल्याने माझ्या मुलीला सुद्धा शाळेतून नाव काढून दुसऱ्या शाळेत टाकत आहो.याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्याने चांगल्या शाळेची वाट लागली आहे.

सुधाकर कराळे
सरपंचपती दिग्रस बु

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: