Poco M6 5G हा एक बजेट 5G स्मार्टफोन आहे, जो भारतात लॉन्च झाला आहे. फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. यात 6.47 इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन Android 13 आधारित MIUI 1 वर काम करतो. फोनमध्ये 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच 5MP फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Poco M6 5G स्मार्टफोनची विक्री 26 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून दुपारी 12 वाजल्यापासून फोन खरेदी करता येईल. फोन तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये येईल. त्याच्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन निळा आणि काळा अशा दोन रंगात येतो.
हा फोन ICICI डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून 1,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. तसेच, एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटची सुविधा उपलब्ध असेल. जर तुम्ही एअरटेल प्रीपेड वापरकर्ते असाल तर तुम्ही 50GB अतिरिक्त डेटाचा आनंद घेऊ शकाल.
#POCO M6 5G- the most affordable 5G smartphone ever, has landed on Flipkart at just ₹9,499*.
— Himanshu Tandon (@Himanshu_POCO) December 22, 2023
Mark your calendars – the sale starts on 26th December at 12 Noon.
Save the link 👉 https://t.co/keV4ryCHXy#POCOIndia #POCOM65G #TheReal5GDisrupter pic.twitter.com/RGnu3YpgMY
Poco M6 5G स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोन MediaTek Dimensity 6100+ सपोर्टसह येतो. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन 2 अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांच्या सिक्युरिटी पॅचसह येईल.
फोनमध्ये संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सपोर्ट देण्यात आला आहे. यात फास्ट साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि अनलॉकिंगची सुविधा आहे. फोन 50MP AI ड्युअल कॅमेरा सपोर्टसह येतो. यात 5MP AI सेल्फी कॅमेरा आहे. फोन 18W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह येतो.