PM Modi : आज शुक्रवारी 19 जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत (PM Narendra Modi). पीएम मोदी तेथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत. दरम्यान, शिवसेना यूबीटी नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते वारंवार येत आहेत एवढेच नाही तर आगामी निवडणुकीत महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे पंतप्रधान सातत्याने येथे भेट देत आहेत.
शिवसेनेचे यूबीटी नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये वारंवार येत आहेत, याचे कारण त्यांना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आवडते असे नाही.
वास्तविक, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत, त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. येथील एकनाथ शिंदे सरकार अपयशी ठरले असून ते भाजपला मते मिळवू शकत नाहीत. म्हणूनच 13 महिन्यांत 8-10 वेळा पीएम मोदी इथे आले, ते मणिपूरला का जात नाहीत?’
#WATCH | Mumbai: On Prime Minister Narendra Modi's visit, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "He (PM Modi) is coming to Maharashtra again and again. It is not that he loves Maharashtra that much, or he is going to Uttar Pradesh not because he loves UP. The Lok Sabha seats… pic.twitter.com/4KY08CohHt
— ANI (@ANI) January 19, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या आठ AMRUT (अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.