न्यूज डेस्क : टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. सामना हरला म्हणून भारतीय तसेच क्रिकेट प्रेमी नाराज आहेत. तर हा सामना का हरला याच विश्लेषण प्रत्येक जन आआपल्या परीने करीत आहे. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना लक्ष करीत त्यांची तुलना पनवतीशी केली आहे.
राहुल गांधींच्या या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्यावर हल्लाबोल केला असून त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगत आहे. यासंदर्भात भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींसाठी जे शब्द वापरत आहेत ते अशोभनीय आहे. राहुल गांधींना मोदींची माफी मागावी लागेल. अन्यथा आम्ही हा देशाचा मोठा मुद्दा बनवू.
राहुल गांधी यांचे वक्तव्य
राहुल गांधी यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जालोरमध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “ते (मोदी) क्रिकेटच्या मॅचला जाणार, ते मॅच हरणार ही वेगळी गोष्ट आहे, पनवती…पीएम म्हणजे पनवती मोदी.”
काँग्रेस खासदार पुढे म्हणाले की, “बरं, आमच्या मुलांनी तिथे वर्ल्ड कप जिंकला असता, पण तिथे पनौती गेल्याने पराभव झाला, पण टीव्हीवाले हे म्हणणार नाहीत. जनतेला हे माहीत आहे.”
अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला
गुजरातमधील अहमदाबाद येथे रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 240 धावा केल्या. भारताकडून केएल राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी खेळली.
त्याचवेळी 241 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 43 षटकांतच लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत आपल्या संघाला विश्वविजेते बनवले.
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023