पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच बायकांनी काढला प्रियकरासोबत पळ…चार पतींनी केली पोलीसात तक्रार…

0
1117

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून एक नव्हे तर चार प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात पती-पत्नीशिवाय प्रशासनातील अधिकारीही अडचणीत आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता जमा होताच येथील चार महिला आपल्या प्रियकरासह पळून गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित पतींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण यूपीच्या बाराबंकी जिल्ह्याशी संबंधित आहे. येथे बेघरांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केले होते. अर्ज मंजूर झाल्यानंतर विभागाकडून पहिला हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आला. एक महिना उलटूनही चार अर्जदारांनी कोणतेही बांधकाम न केल्याने विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतरही कोणतीही प्रगती होत नसताना अधिकाऱ्याने वसुलीची नोटीस पाठवली होती.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही चार प्रकरणे जिल्ह्यातील नगर पंचायत बेल्हारा, बांकी, जैदपूर आणि सिद्धौर भागातील आहेत. विभागाकडून वसुलीची नोटीस पाठवण्यात आल्यावर चार पीडितांनी विभाग गाठून आपली व्यथा सांगितल्याचे सांगण्यात आले. पीडितांच्या म्हणण्यानुसार, घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रियकरासह पळून गेल्या आहेत. एवढेच नाही तर आता हप्ता पाठवू नका, असे बाधितांनी विभागाला लेखी कळवले आहे.

विभागाने तपास केला असता प्रकरण योग्य असल्याचे निष्पन्न झाले.
पीओ दुडा सौरभ त्रिपाठी यांनी या नोटिसा पाठवल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर पीडितांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासात चारही प्रकरणे बरोबर आढळून आली आहेत. विभागाने हप्ता देणे बंद केले आहे. आता महिलांच्या पतींसोबतच खात्याच्या अधिकाऱ्यांनाही पैसे वसुलीची चिंता सतावू लागली आहे. पीडितांची व्यथा समोर आल्यानंतर ही बाब समोर आली आहे.