Sunday, November 17, 2024
Homeराजकीयनृत्य स्पर्धेच्या माध्यमातून युवांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम - माजी पालकमंत्री...

नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून युवांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम – माजी पालकमंत्री अंबरीश राव महाराज यांचे प्रतिपादन…

आल्लापल्ली येथे राज्य स्तरीय समूह नृत्य व लावणी स्पर्धेचे आयोजन…

अहेरी – मिलिंद खोंड

आपल्या भागातील युवावर्गाच्या अंगी अनेक सुप्त गुण लपले असून,त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आलापल्लीत या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या व्यासपीठाचा कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने फायदा घेण्याचे आवाहन माजी पालकमंत्री राजे अंबरीश राव यांनी आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर एम.डी बहुउद्देशीय शिक्षण व विकास संस्थेद्वारा आयोजित राज्यस्तरीय समूहनृत्य व लावणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगीं केले.

या वेळी मंचावर अध्यक्ष म्हणून आल्लापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37 बटालियन चे कमांडंट एमएच खोब्रागडे, अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे,आल्लापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशो र पांडे, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष दीपक तोगरवार,माजी जीप सदस्य विजया विठ्ठलानी,

सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश शेंडे, संगीता बुरांडे,अज्जू पठाण,गिरीश मद्देर्लावार,अमोल कोलपाकवार,शकुंतला दुर्गम,नृत्य स्पर्धेचे परिक्षक मोहन, नंदू गुरंग, दीपा गुरंग ,अँकर शंकर, स्पर्धेचे आयोजक रफिक पठाण व व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड आदींची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे आयोजक रफिक पठाण व मिलिंद खोंड यांनी उद्घाटक अंबरीश राव महाराज यांचे पुष्पहाराने स्वागत केले. या वेळी गडचिरोली येथील महा मॅरेथॉन मध्ये 5 की.मी विजेत्या अंकिता मडावी व निकिता मडावी यांचा माजी पालकमंत्री अंबरीश राव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विविध ठिकाणाहून आलेल्या नृत्यांगनाचे कलाविष्कार बघण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारा ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

या स्पर्धेत एकल लावणी प्रकारात प्रथम बक्षिस सुगीत उराडे तर द्वितीय प्रतीक भैसारे यांनी तर समुह नृत्य स्पर्धेत प्रथम तळोधी येथील भवानी ग्रुप, तर द्वितीय चंद्रपूर येथील इलेक्ट्रो ग्रुप तर तृतीय बल्लारशा येथील नवरंग ग्रुपने पटकाविले समूह लावणी मध्ये नागपूर येथील जुडवा ग्रुप प्रथम तर एस.आर.ग्रुप ने द्वितीय पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा शिल्ड व रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शंकर व सुहासिनी बागडे यांनी केले तर आभार मिलिंद खोंड यांनी केले.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: