सांगली – ज्योती मोरे
माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक आठ मधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तुळजाई नगर आदी भागात आज सकाळी अकरा वाजता ओपन स्पेस मध्ये महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य जी बी पाटील, गिरीश किर्लोस्कर,कु. श्रावणी उदय पाटील, भाग्यश्री क्षीरसागर, राजीव तेरवाडकर, डॉक्टर शार्दुल तेरवाडकर, गार्डन विभाग प्रमुख गिरीश पाठक, सुनील कुंभार, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, मुकादम प्रकाश चव्हाण आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.