रामटेक – राजु कापसे
आज हिवरा बाजार येथील एनटीपीएस भरती पूर्व प्रशिक्षण शाळेत वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला , त्यात विविध प्रजाती ची लिंबू,कडुनिंब, पेरू, आवळा,फणस, जांभूळ,रामफळ,आंबा, असे एकूण 575 फळझाडे शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. टी. एस.भाल ,केंद्र संचालक अर्जुन जी घुगल , नागपूर राज्य उत्पादन शुल्क चे माजी पोलीस अधीक्षक सुरेंद्र मनपिया, शशिकांत डेलिकर , संचालक मोहन देशमुख ,केंद्र सहसंचालक जगन्नाथ गराट ,सलाई चे सरपंच उत्तम धराडे ,संचालक हर्षवर्धन देशमुख,
माजी प्राचार्य वासुदेव निंघोट,कृष्णा भाल ,पंचम चौधरी, देवेंद्र अवथरे, अमोल येनगड,प्रकाश गराट, संदीप गवई,विशाल दीक्षित व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, सामाजिक वनीकरण विभाग, देवलापार यांचे कडून सर्व फळझाडे निःशुल्क प्राप्त झाली.या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी सर्व लागवड केलेल्या फळ झाडांची देखभाल व संगोपन करण्याचा संकल्प केला,