पिंपरी (विकास साळवे), पुणे
पिंपरी शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या अंकीत असलेले नवी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाच्या नावाखाली अनेक मसाज पार्लर चालतात, या पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून तरूण मुलींना आणले जाते आणि या मुलींकडून पुरूषांची मसाज करून घेतल्या जाते हे या तरूण मुलींसाठी अतीशय धोकादायक आहे,कोण पुरूष कोणत्या मानसिकतेत असतो हे सांगणे कठीण असते,अशाच परिस्थितीत काही पुरूष दारू पिलेल्या अवस्थेत नशेमध्येच मसाज घेण्यासाठी येतात,त्यांचेकडून या तरूण असणा-या तरूणींवर अतीप्रसंग ओढावण्याची शक्यता असते,असे असतांनाही अशा मसाज पार्लकडे तथा स्पा सेंटरकडे पोलीस दुर्लक्ष करतांना दिसत आहेत,
तसेच कृष्णा चौकात असलेले ब्रिंडल स्पा हे निवासी सोसायटीमध्ये चालविले जाते.तरीही याकडे पोलीस दुर्लक्ष का करतात असे प्रश्न उपस्थित होत आहेत,अशा स्पा अर्थात मसाज पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी आणल्या जाणा-या तरूणींची माहीतीही पोलीस ठाण्यामध्ये आहे की नाही शंका आहे.
या मसाज पार्लरबरोबर हॉटेलिंग व्यवसायही रात्री उशीरापर्यंत चालू असतात हे कुणाच्या आशिर्वादाने चालतात असेही प्रश्न जनतेमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. सर्रासपणे चायनीजच्या गाड्यावर तरूणवर्ग दारू पित असल्याने चायनीजच्या दुकानांना व बियर शॉपी तथा वाईन शॉपींना बियर बारचे स्वरूप प्राप्त झाले आहे,याकडेही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र आहे.