मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावर अर्धकाशी महत्व प्राप्त पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे दरवषी प्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी दिनांक 1 सप्टेंबर 2024 ला कावड उत्सव साजरा होणार आहे. या कावड यात्रेत मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील हजारो शिवभक्त सहभागी होणार आहे.
कावड यात्रेतील सहभागी शिवभक्तांसाठी श्री लक्षेक्ष्वर संस्थान व कावड उत्सव समिती तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . शिवकावड लावण्यासाठी जागा सपाटीकरण व नदीपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम मा. आ. हरिषभाऊ पिंपळे यांनी करून दिले . श्री लक्षेक्ष्वर संस्थान तर्फे प्रवेशद्वार ते नदी पर्यंत लाईट व्यवस्था , नदीवर तैराकी पथक , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मूर्तिजापूर तालुका प्रशासनाच्या वतीने नदीवर सर्च लाईट , आरोग्य पथक , पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे . संपुर्ण कावडयात्रा दरम्यान मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा पो . उपविभागीय अधिकारी मा. दाभाडे , पो , स्टे. निरीक्षक मा .कैलास भगत , पी . एस . आय. वानखडे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त तैनात राहील तसेच दर्यापूर ते लाखपुरी पर्यंत कावड बंदोबस्त नियोजन दर्यापूर पो . उपविभागीय अधिकारी मा . नायडू यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर पो.स्टे. निरीक्षक सुनील वानखडे यांनी केले आहे.
श्री लक्षेक्ष्वर संस्थान येथुन कावड प्रस्थान वेळी प्रत्येक कावडचे पूजन करण्यात येईल . यावेळी अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी , पत्रकार बांधव ,सामाजिक कार्यकर्ता , कावड उत्सव सहकारी उपस्थित राहतील.
कावड यात्रेचे पावित्र राखत उत्साहात कावड यात्रेत सहभागी होऊन कावड दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्षेक्ष्वर संस्थान व सार्वजनिक कावड उत्सव समिती मुर्तिजापूर , दर्यापूर व अंजनगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.