Monday, December 23, 2024
HomeSocial TrendingPhonePe चे नवीन Indus app store लाँच...Google Play Store ची गरज संपणार...

PhonePe चे नवीन Indus app store लाँच…Google Play Store ची गरज संपणार…

PhonePe : मोबाईल ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी आपण आतापर्यंत Google Play Store वापर केल्या जातो. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Google Play Store आधीच दिलेले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, अँड्रॉइड ॲप मार्केटमधला Google हा एकमेव साधन आहे. अशा परिस्थितीत गुगल स्वतःचे नियम बनवते, ज्याचे पालन प्रत्येक ॲपला करावे लागते.

यामुळेच गुगल प्रत्येक ॲपवरून स्वतःचे शुल्क आकारते, त्यामुळे ॲप डेव्हलपर बर्याच काळापासून अडचणीत आले होते, परंतु आता हे वर्चस्व कमी होऊ शकते, कारण PhonePe चे नवीन Indus Apps Store लाँच केले गेले आहे, जे Google वर उपलब्ध आहे. हे प्ले स्टोअरचे वर्चस्व संपवू शकते.

वॉलमार्टच्या मालकीच्या PhonePe ने सुमारे 2 लाख ॲप्ससह नवीन Android आधारित मोबाइल ॲप्लिकेशन स्टोअर लॉन्च केले आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे ॲप स्टोअर एकूण 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.

या ॲप स्टोअरवर 1 एप्रिल 2025 पर्यंत कोणतेही लिस्टिंग शुल्क आकारले जाणार नाही. भारत हा एक मोठा स्मार्टफोन बाजार आहे, जिथे दररोज हजारो मोबाइल ॲप्स डाउनलोड केले जातात.

प्रगती मैदान, दिल्ली येथे स्थित भारत मंडपम येथे Indus App Store लाँच करण्यात आले आहे. या ॲप स्टोअरवरून मोबाइल ॲप्स डाउनलोड करणे मार्चपासून सुरू होईल. भारताच्या डिजिटल प्रवासात हा एक मैलाचा दगड ठरू शकतो, असा विश्वास आहे.

विकासक इंडस ॲप स्टोअरवर थर्ड पार्टी पेमेंट गेटवे वापरण्यास मोकळे असतील. ॲप स्टोअरवर जवळपास 45 ॲप श्रेणी असतील. तसेच, अगदी नवीन शॉर्ट व्हिडीओ आधारित व्हिडिओ सुविधाही दिली जाईल.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: