सांगली – ज्योती मोरे
पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविरोधी इस्लामिक अतिरेकी संघटनेवर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सांगलीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे महिला तसेच पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.