रामटेक 🙁 प्रतिनिधी )
दि.४ मे रोजी मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अनैतिक अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकार्यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके यांनी एक निवेदन सादर करताना निवेदनात म्हटले कि मला वेदना होत आहेत की, या भारत देशाचे नागरिक असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी, मणिपूर राज्यातील कांगकोपाकी जिल्ह्यात झालेल्या घटनेचा आम्हाला तिरस्कार वाटतो. ४ मे २०२३ रोजी तीन कुकी आदिवासी महिला वर काही समाजकंटकांकडून अनैतिक अत्याचार आणि सामूहिक बलात्कार. एवढेच नाही तर त्या आदिवासी महिलांना लोकांसमोर विवस्त्र करून व्हिडिओ काढण्यात आले. मातृशक्ती आणि सशक्त महिलांचा आदर करणाऱ्या या देशातील अशा निंदनीय आणि घृणास्पद कृत्यासाठी आपण आदिवासी मूलनिवासी या देशातील शासन आणि प्रशासन यंत्रणेला दोषी मानतो तसेच ४ मे २०२३ रोजी घडलेल्या या घटनेचा आम्ही निषेध करतो की, मणिपूर राज्य सरकारने आणि प्रशासनाने त्या दोषी आरोपींना फाशी देण्यासाठी कठोर कारवाई केली पाहीजे. आदिवासी महिलांवर होणारे अनैतिक अत्याचार, सामूहिक बलात्कार आणि खून, बहिणींचे संरक्षण आणि सूडबुद्धीने झालेल्या भावाची हत्या, या गोष्टींकडे पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.
यासाठी आदरणीय राष्ट्रपती महोदय यांनी शुध्दा या सर्व गोष्टी न नाकारता या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशातील आदिवासींनी बलिदान दिले आहे. वरील घटनेमुळे या देशात काही अनैतिक प्रकार घडले तर त्याला या देशाचे सरकार व प्रशासन जबाबदार राहील. महामहिम, आपण या निंदनीय घटनांकडे लक्ष देऊन त्या दोषींवर योग्य ती कारवाई करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती. निंदनीय घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने मुख्यमंत्र्यांना तात्काळ राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिजे.
अश्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवुन तसेच पंतप्रधान, भारत सरकार, दिल्ली, गृहमंत्री, भारत सरकार, दिल्ली , राज्यपाल, मणिपूर राज्य ,मुख्यमंत्री, मणिपूर राज्य, महिला आयोग अध्यक्षा, भारत सरकार, अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष, भारत सरकार ला पाठवण्यात आले. यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरिष उईके यांचे सह सरचिटणिस सुधाकरजी आगम ,युवा प्रदेशाध्यक्ष राजेश इरपाते ,जिल्हाध्यक्ष धनराजजी मडावी ,महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमाताई मडावी,राष्ट्रीय उपाध्यक्ष रेखाताई निखारे ,दिनेश सिझाम , नागपूर शहर अध्यक्षा अंगाताई काम जिन्हाळमा सह आदी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.