Monday, December 23, 2024
Homeराज्यगुगुलडोह मॅगनीज खाणीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारींना निवेदन...

गुगुलडोह मॅगनीज खाणीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारींना निवेदन…

रामटेक – राजू कापसे

अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या कायद्याच्या अंतर्गत सामूहिक अनुसंगाने सामुदायिक वन हक्क समिति गुगुलडोह गौण वनउपज गेल्या २-३ वर्षापासुन तेंदू गोळा करत आहे. ज्याच्या माध्यमातुन स्थानिक लोकांना रोजगार मिळत आहे.

तसेच गुगुलडोह परिसर जंगलाने वेढलेला आहे. जे जंगल विविध प्रजातीच्या वृक्षांणी व्यापलेले आहे. यामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पति आणि वृक्षाचा देखील समावेश आहे. या जंगलात वाघ बिबट चितळा असे इतर जंगली श्वापदाचा अधिवास आहे.

केजबाराजा (भाजी मोकाशा) व मोंगुरकस्सा चे प्रसिध्द पुरातन देवस्थान (पेनठाना) असुन आदिवासी समाज दोनही देवस्थान गॉड दैवत एक महत्वपुर्ण सन्मानाचे व पुज्यनिय देव म्हणुन प्राचिन मान्यता आहे. म्हणुन संपुर्ण आदिवासी समाज शिवरात्रीच्या पावन पर्वावरती आदिवासी संस्कृती नुसार पुजा-अर्चना करण्यासाठी मोठया संख्येन मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी समाज यात्रा भरवुन श्रध्दा पुर्वक मान्यतानुसार नक्स करतात.

परंतु शासनाच्या वतीने गुगुलडोह येथे मॅगनीज प्रकल्प उभरण्याची तयारी चालु आहे. त्यामुळे आदिवासींचे प्राचिन देवस्थान उदवस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आमचा आदिवासी समाजाचा धार्मिक आस्थेवर मोठा आघात करण्याचा प्रयत्न शासनाने करू नये.

याचा आम्ही विरोधकरतो वरील प्रकल्पाची सुरुवात झाल्यास ४० हजार झाडे कापण्यात येतील परंतु जिल्हयात अतिक्रमन धारकांनी पट्टे मागणीचे प्रस्ताव आपल्या विभागाला सादर केले असले तरी अतिकमन धारकांना अजुन पर्यंन्त पट्टे मिळाले नाही दुसरीकडे जंगल नष्ट करून प्रकल्प उभारल्याने मानवी वन्यजीवन धोक्यात येईल व पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होईल तसेच स्थानीक लोकांच्या उपजीवेकेचा व रोजगाचा प्रश्न निर्माण होईल.

हा प्रकल्प ह्या क्षेत्रासाठी वर्धान न ठरता श्राप ठरेल, याकरिता मॅगनीज प्रकल्प त्वरीत रद्द करण्यात यावे. अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने उग्र जन आंदोलन करण्यात येईल. तसेच या आंदोलनात कोणत्याच प्रकारचे अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जवाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा जिल्हा परिषद सदस्य हरिश उईके यानी दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: